(मुंबई)
बनावट देयकांच्या माध्यमातून शासनाचा ७ कोटींचा महसूल बुडवणाऱ्या एका बोगस व्यापाऱ्यावर महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने कारवाई केली आहे. जगदीश जगन्नाथ पाटील (वय ४८) असे आरोपीचे नाव आहे.
मे. अर्णव क्रिएशन या व्यापाऱ्याचे दोन मोठे पुरवठादार मे. हेना इंटरप्रायझेस व मे. एक्सकर्सी ओव्हरसिज हे करदाते अस्तित्वात नसून बोगस आहेत. त्यांनी बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी केली आहे. या करदात्यांकडून संबंधित व्यापाऱ्याने ७.०८ कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, असे तपासादरम्यान आढळून आले. या प्रकरणी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जगदीश पाटील याला १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.