(क्रीडा)
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत यावेळी एकूण 10 संघ विश्वचषकात खेळत आहेत, ज्यात भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेदरलँड यांचा समावेश आहे. आतापर्यंत 40 सामने खेळले गेले आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील बहुतेक सामने हाय-स्कोअरिंग झाले आहेत. या स्पर्धेत फलंदाज मैदानात चांगल्याच धावा काढत आहेत. अशावेळी विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज कोण आहेत याची माहिती घेऊया.
1.क्विंटन डी कॉक
पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉकचे नाव आहे, ज्याने या विश्वचषकात एकूण 8 सामने खेळताना 550 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या 174 धावा होती. डी कॉकने आतापर्यंत एकूण 4 शतके झळकावली आहेत.
2. विराट कोहली
दुसऱ्या स्थानावर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव आहे, ज्याने आतापर्यंत 8 सामने खेळताना एकूण 543 धावा केल्या आहेत. कोहलीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 103 होती. किंग कोहलीने या विश्वचषकात एकूण 2 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत.
3. रचिन रवींद्र
तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्रचे नाव आहे, ज्याने या विश्वचषकात 8 सामने खेळताना 523 धावा केल्या आहेत. रचिनची सर्वोच्च धावसंख्या म्हणजे नाबाद 123 धावा. त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतके केली आहेत.
4. डेव्हिड वॉर्नर
चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने 8 सामने खेळताना 446 धावा केल्या आहेत.
5. रोहित शर्मा
पाचव्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे नाव आहे, ज्याने 8 सामने खेळताना एकूण 442 धावा केल्या आहेत. रोहितने या कालावधीत केवळ 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत.