24 न्यूज l संगमेश्वर I 29 नोव्हेंबर
संगमेश्वर तालुक्यातील वांद्री ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने लाखोंचा आर्थिक अपहार केल्याचे येथील ग्रामस्थाच्या तक्रारीवरून समोर आले आहे.
यासंदर्भात अभिषेक सुहास मयेकर व इतर 2 यांनी वांद्री ग्रामपंचायतीत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्याकडे केली होती.
या तक्रारीनुसार वांद्री ग्रामपंचायतीत तत्कालीन सरपंच सुभाष धोंडू सालीम ग्रामसेवक रोशन अनंत जाधव यांनी संगनमताने रुपये 8 लाख 42 हजार 740 इतकी अपहाराची रक्कम परस्पर काढून घेतली असा नेमलेल्या चौकशी समितीने आरोप ठेवला आहे. या आरोपांच्या आधारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती संगमेश्वर यांना योग्य ती कारवाई करावी तसेच त्यांच्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली याची माहिती कळवण्याचे आदेश दिले आहेत.
रत्नागिरी 24 तास
अपडेट रहा, स्मार्ट बना…!
www.ratnagiri24taas.com
l ज्ञान l मनोरंजन l आरोग्य l टिप्स-ट्रीक्स l
https://bit.ly/2XjFLVE
………………………………………….