(रत्नागिरी)
नुकत्याच झालेल्या क्लब सभेमध्ये लायन्स क्लब रत्नागिरीच्या २०२३ – २४ साठी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी लायन शिल्पा पानवलकर, सचिवपदी लायन संजय पटवर्धन तर खजिनदार पदावर श्रद्धा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
लायन शिल्पा पानवलकर या गेल्या बारा वर्षापासून लायन्स क्लब सदस्य असुन त्यांनी यापूर्वी लायनेस क्लबचे अध्यक्ष पद भूषवले आहे तसेच २०१८ -१९ मध्ये लायन्स क्लब रत्नागिरीच्या सचिव पदावर काम केलेले आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अंगणवाडी प्रशिक्षण सेवा केंद्राचे प्राचार्यपदही त्यांनी भूषवले आहे.
सचिवपदावर निवड झालेले लायन संजय पटवर्धन हे रत्नागिरीतील प्रतीथयश व्यावसायिक असून पटवर्धन फूड्स हा त्यांचा व्यवसाय रत्नागिरीत कार्यरत आहे. तीन वर्षांपूर्वी लायन्स क्लब सदस्यत्व त्यांनी स्वीकारले असून तेव्हापासून लायन्स क्लब रत्नागिरीच्या सर्व सेवा कार्यांमध्ये ते हिरिरीने सहभाग घेत असतात. लायन श्रद्धा कुलकर्णी याही गेली बारा वर्षे लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या सदस्या असुन सुगम संगीत विषारद आणि वटवृक्ष डिस्टिबुटर या नावाने डेअरी प्राॅडक्ट वितरण व्यवसाय करत आहेत.
प्रथम उपाध्यक्ष पदावर लायन श्रीपाद केळकर यांची निवड झाली असून एलआयसी चे काम करताना त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. वरील सर्व सदस्यांचा आणि २०२३ – २४ या वर्षाच्या संचालक मंडळाचा शपथविधी सोहळा जुलै मध्ये होईल असे अध्यक्ष लायन प्रवीण जैन यांनी सांगितले.