(रत्नागिरी/प्रतिनिधी)
उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांची भेट घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मंत्री श्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात समाजसेवेसाठी आपण सक्रीय होणार असल्याचे अशोक पवार यांनी सांगितले.
रा. स. प. ची जिल्ह्यातील मोठी जबाबदारी सांभाळणारे अशोक पवार यांच्यासोबत असणाऱ्या अनेक सहकाऱ्यांचा देखील काही दिवसातच शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार आहे असे देखील अशोक पवार यांनी यावेळी सांगितले. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या सध्या वाढताना दिसत असून उदय सामंत यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर वरचष्मा दिसून येत आहे.