(पुणे)
निष्ठेने सेवा करणा-या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. शालेय शिक्षण विभागाने २०२२-२३ या वर्षातील राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी केली. या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या मंगळवारी (दि. ५) मुंबईत होणार आहे.
या पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी राज्य निवड समितीची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीतील शिफारशीनुसार राज्य सरकारने पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्कारांचे वितरण शिक्षक दिनाचे औचित्य साधून होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
प्रवर्गनिहाय पुरस्कारांची संख्या
प्रवर्ग : पुरस्कारांची संख्या
-प्राथमिक : ३७
-माध्यमिक : ३९
-आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) : १९
-थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार : ८
-विशेष शिक्षक कला/क्रीडा : २
-दिव्यांग शिक्षक/दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक : १
-स्काऊट/गाइड : २
राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्राथमिकमधील ३७, माध्यमिक गटात ३९, आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या १९, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका ८, विशेष शिक्षक कला-क्रीडा २, दिव्यांग गटात १ आणि स्काउट – गाइड्स गटात २ अशा एकूण १०८ पुरस्कारांची जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण येत्या ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी मुंबईत करण्यात येणार आहे.
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⇒ LIST