(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे घोगलवाडी येथे अवैधरित्या गावठी दारू बाळगणाऱ्या वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश्चंद्र रामचंद्र रहाटे (62, सांडेलावगण तेली वाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आह़े. ही कारवाई शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास करण्यात आल़ी.
पोलिसांनी त्याच्याकडून 9 लिटर गावठी दारू हस्तगत केली. त्यानुसार पोलिसांनी हरिश्चंद्र रहाटे याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे.