(रत्नागिरी)
चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर मुंबई विद्यापीठ, रत्नागिरी उपपरिसरातील एमएससी रसायनशास्त्र विभागातील 19 विद्यार्थ्यांनी इंटर्नशीप पूर्ण केली. औद्योगिक क्षेत्राची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी दरवर्षी उपपरिसरातील विद्यार्थ्यांना इंटर्नशीप दिली जाते. उपपरिसरातील साक्षी चाळके, शुभम राऊत, प्रसाद चव्हण, धनश्री धुरी, तन्वी सौदागर आणि इतर विद्यार्थ्यांनी गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन विभागात ही इंटर्नशीप पूर्ण केली आहे.
गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन विभागाचे प्रमुख बालाजी हिरेनाईक आणि मानव संसाधन व्यवस्थापक क्रांतीकुमार लंका याचे सहाय्य आणि मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभलं. रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. गिरीष कदम, प्रा. तैफीन पठाण यांचे मार्गदर्शन लाभले.