(रत्नागिरी)
संस्कार भारती दक्षिण रत्नागिरी समितीकडून “किशोर कुमार के नगमों की रंगीन यादे” हा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथील जयेश मंगल पार्क येथे रविवारी २३ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात संजय पाटणकर, प्रियांका फडके, पल्लवी गोखले, शिल्पा सुर्वे, वैष्णवी रिसबुड, शलाका संधू , रोजा भुर्के आदी सहभागी होऊन गाणी सादर करणार आहेत.
कार्यक्रमाचे संगीत संयोजक राजन किल्लेकर करणार असून, निवेदन वैष्णवी रिसबूड करणार आहेत. “किशोर कुमार के नगमों की रंगीन यादे” या कार्यक्रमाचा संगीतप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.