( रत्नागिरी / प्रतिनिधी )
नुकतेच रत्नागिरीतील दोन गिर्यारोहक हिमाचल प्रदेशातील लाहौल भागात असलेले माउंट युनाम हे 6111 मीटर तसेच 20 हजार 100 फूट उंचीवर असणारे शिखर यशस्वी चढाई करून भारताचा राष्ट्रध्वज फडकवला आहे. गृहरक्षक दलातील जवान आकाश पालकर आणि प्रसाद कासार या दोघांनी उनाम शिखर सर करून रत्नागिरीकरांसह सर्वच भारतीयांची मान उचांवली आहे. चोहोबाजूंनी या दोघांचे कौतुक होत आहे. यातच आता रत्नागिरी आकाशवाणी केंद्रानं त्यांची मुलाखत घेतली आहे. या दोघांची आकाशवाणीवर सौ. कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून उद्या, दि. १२ ऑगस्टला सकाळी ११ : १० प्रसारीत केली जाणार आहे. सदरची मुलाखत न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरसुद्धा सर्वत्र ऐकता येणार आहे.
गिर्यारोहक आकाश पालकर आणि प्रसाद कासार यांनी युनाम शिखर सर केल्याचा थरारक अनुभव त्यांच्याच तोंडून रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून जिल्ह्यावासियांना ऐकता येणार आहे.