मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील मोरवंडे शाळा येथे भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, विजय कृष्णा मोहिते (४८) असे दुचाकीस्वाराने नाव असून तो चिपळूण तालुक्यातील तळसर मुंडे येथील रहिवाशी आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेला हा अपघात पावसामुळे रास्ता निसरडा झाल्याने घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मोहिते यांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने अनर्थ टळला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यातील तळसर येथे राहणारे विजय कृष्णा मोहिते हे आपल्या दुचाकीवरून चिपळूण येथून खेडकडे येत होते. त्याची दुचाकी मोरवंडे शाळेसमोर आली असता समोरून येणारा डंपर पावसामुळे निसरडा झालेल्या रस्त्यावरून घसरला आणि हा अपघात झाला.
अपघाताची खबर मिळताच येथील मदत ग्रुप खेड व हायवे मृत्युन्जय दुतचे प्रसाद गांधी, रोहन इनरकार आणि अतुल जोशी रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेले माेहिते यांना प्रसिद्धी रुग्णवाहिकेतून चिपळूण येथील विठाई रुग्णालयात दाखल केले. सध्या मोहितेयांच्यावर विठाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.