कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांअंतर्गत काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये विविध सेवांच्या वाहनांचा समावेश ठराविक प्रवर्गांमध्ये करत त्यांच्यावर लाल, हिरवा आणि पिवळ्या रंगाचे स्टीकर लावण्याचा नियम मुंबई पोलिसांकडून लागू करण्यात आला होता. पण, आता मात्र ही अट मागे घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
यापुढं वाहनांवर रंगीत स्टीकर लावण्याची अट बंधनकारक नसली तरीही वाहनांची तपासणी मात्र सुरुच राहणार आहे. लॉकडाऊनचे नियम लागू होता वाहनांच्या ये-जा करण्यावर आलेल्या निर्बंधांअंर्गत काही वाहनांना यातून वगळत त्यांना स्टीकर लावण्याचे निर्देश दिले होते.