(रत्नागिरी)
या धावपळीच्या जीवनात व्यक्ती सुखसुविधांच्या मागे लागत असताना मात्र स्वतःच्या आरोग्याची फारसे लक्ष देत नाही. सगळ्या जबाबदाऱ्यातून पुढे जाताना मात्र माणूस हा मानसिकदृष्ट्या समाधानी नसल्याने विशेषतः आताच्या तरुण पीढीमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढतेय. यासंदर्भात वेळेत उपचार घेणे, आणि सकस आहार, व्यायाम आणि मानसिकदृष्ट्या समाधानी राहणे महत्वाचे आहे तरच हृदयविकाराचे प्रमाण कमी होईल. हृदयविकार झाला तरी त्यावर उपाययोजना आहेत, त्याची माहिती हृदयरोग तज्ज्ञांकडून घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मतिन परकार यांनी व्यक्त केली.
परकार हॉस्पीटल आणि मराठी पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विदद्यमाने येथील गोगटे कॉलेजच्या कै राधाबाई सभागृहात जागतिक हृदयरोग दिनानिमित्त हृदय स्पंदन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉ. मतिन परकार यांनी तर आथ्रोपेडिक डॉ. केतन कोदारे यांनी संधीवाताचे शरीरावर होणार परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार जान्हवी पाटील यांनी या तज्ज्ञांशी संवाद साधला.
मनुष्य जितका प्रगतीकडे वळत आहे, तितकच तो स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे, आज मेडिकल सायन्स इतक पुढे गेले आहे की, नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित वेदनारहित उपचारही होतात. आज माणूस कितीही धावपळ करत असला तरी मानसिकदृष्ट्या समाधानी असणे गरजेचे आहे. ताणतणावाच्या ओझाखाली तो दवला जात आहे, परिणामी हृदयरोगाचे प्रमाण अगदी तिसी चाळीत वाढत आहे. जितके शक्य आहे, तितकंच माणसाने करावे, एका सहनशिलतेच्या पलीकडे कोणतीही गोष्ट गेली की, त्यांचा एकदा स्फोट होतो, मग ती कोणतीही गोष्ट असू शकते असे सांगतानाच ॲन्जोग्राफी, टूडी इको इसीजी या चाचण्याबाबतही डॉ मतिन परकार यांनी यावेळी माहिती दिली. परकार हॉस्पीटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचार देखील होतात याचाही लाभ रुग्णांनी घ्यावा असेही त्यांनी शेवटी सांगितले.
दूध पिल्यानेच कॅल्शियम वाढत असे नाही, दुग्धजन्य पदार्थ इतर सकस आहार घेतला तर आपली हाडे अधिक मजूबत होतील सर्वसामावेशक असा आहार नियमित घेतला पाहिजे त्याचबरोबर लहान वयात मुलांना कोवळ सूर्यप्रकाश दिला पाहिजे यातून डी विटामीन मिळते अशी माहिती यावेळी डॉ. कोदारी यांनी दिली. सध्या बदलतो जीवनशैलीमुळे बैठे कामाचे प्रमाण वाढल आहे. त्यामुळे पाठीचे, मणक्याचे, पायाचे आजार वाढत आहे. बैठे कामातूनही वेळ काढून व्यायाम वगैरे करणे आवश्यक आहे. अंगमेहनतीचे कामे कमी झाली असून ऑफीस बैठे काम करणाऱ्यामध्ये या आजाराचा त्रास अधिक असल्याचेही ते बोलले. हाडे मजबूत राहण्यासाठी केवळ आहार महत्वाचा नाही त्या बरोबर शरिराला व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. फास्टफूडचा वाढता वापरही हा मजबूत होत नाही असे आथ्रोपेडिक डॉ केतन कोदारे यांनी सांगितले.
या चर्चासत्रानंतर आरोग्य क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून उत्तम काम करणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठान व नगर परिषद सफाई कामगार व स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचारी यांना सन्मानपत्र, शाल व रोप देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. मतिन परकार, डॉ. केतन कोदारे यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष हेमंत वणजु, कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुका अध्यक्ष आनंद तापेकर, सचिव जमीर खलके, उपाध्यक्ष सतिश पालकर, प्रशांत पवार, केतन पिलणकर, प्रशांत जाधव, समीर शिगवण आदी उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना जान्हवी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ अनुराधा लेले यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा साठे यांना केले.