(गुहागर)
गुहागर आगाराच्या एका पाटील नामक वाहकाने महीलेशी उद्धटपणे वर्तन केले. शृंगारतळी येथे आल्यावर त्या महिलेचे भाऊ पोलीस पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांकरवी दुपारच्या भर उन्हात वाहकाने मार खाल्ला. त्यावेळी महिलांनीही त्या वाहक पाटलाच्या कानाखाली पूजा घालून यथेच्च महाप्रसाद दिला.
चिपळूणहून दुपारी सुमारे १ वाजता सुटणारी गुहागर आगाराची चिपळूण – गुहागर गाडी सुटली. तिकीट काढतेवेळी वाहक पाटील हे महाशय एसटीतील अनेक महिलांशी उद्धटपणे बोलू लागले. मात्र या महिलांमधील एक महिला “दामिनी” निघाली. चित्रपटाप्रमाणेच या महिलेने “दबंगीरी” करणाऱ्या वाहकाला चांगलेच खडेबोल सुनावले. चिपळूण शृंगारतळीपर्यंत एसटीतील अनेक महिलांनीही त्याला जाबही विचारला, तरी पाटील नामक वाहक काही ऐकेना. एक तासाच्या प्रवासानंतर चिपळूण – गुहाग- एसटी श्रृंगारतळी येथे आली. यावेळी या एसटीतील महिलांचा आवाज ऐकून रिक्षा स्टॅन्ड येथे असलेले पोलीस पाटील व त्यांच्या सहकारी यांनी या वाहकाला जाब विचारल असता त्यांच्याशीही तो वाहक उद्धटपणे बोलू लागला. वाहकाची उद्धट भाषाशैली ऐकताच पोलीस पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहकाला चोप दिला.