(नागपूर)
मध्य रेल्वेने ४२ एक्सप्रेस गाड्यांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबे जाहीर केले आहेत. रेल्वे स्थानकांवर थांबे मिळावेत यासाठी विविध भागांतून मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्यांना रेलवे प्रशासनाने मंजुरी दिल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. त्यानुसार कोल्हापूर धनबाद एक्सप्रेसला नागपूर विभागातील पिंपळखुट्टी स्थानकात थांबा देण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकात निझामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस आणि एलटीटी कोचिवली एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. नागपूर, कल्याण, होटगी, कोपरगाव आणि कान्हेगाव स्थानकावर गाड्यांना सहा महिन्यांसाठी प्रायोगिक थांबा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस( सीएसएमटी) -हावडा दुरांतो एक्सप्रेस २३ ऑगस्ट रोजी कल्याण येथे संध्याकाळी ५.५९ वाजता येईल आणि संध्याकाळी ६.०१ वाजता सुटेल. हावडा- सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.०० वाजता पोहोचेल आणि संध्याकाळी ७.०२ वाजता सुटेल. पाटणा- सीएसएमटी सुविधा एक्सप्रेस याच दिवशी दुपारी १.३३ वाजता येईल आणि १.३५ वाजता सुटेल. याशिवाय सीएसएमटी- पाटणा सुविधा एक्सप्रेस २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता येईल आणि दुपारी १२.०२ वाजता सुटेल. यशवंतपूर- दिल्ली सराई रोहिला दुरांतो एक्सप्रेस दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४.१५ वाजता पोहोचेल आणि दुपारी ४.२० वाजता सुटेल. दिल्ली सराई रोहिल्ला- यशवंतपूर दुरांतो एक्सप्रेस दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १.२५ वाजता पोहोचेल आणि दुपारी १.३० वाजता सुटेल