( मंडणगड / प्रतिनिधी )
मंडणगडातील सातीवणीची विहीर येथील एका विहिरीत 45 वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटली असून विष्णू सखाराम साळुंखे (45, साळुंखेवाडी, कुंबळे, मंडणगड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विष्णू हा 3 जानेवारी रोजी घरातील कोणालाही न सांंगता घरातून बाहेर पडला होता. मात्र सायंकाळी तो घरी न आल्याने घराच्यांनी शोधाशोध सुरु केली. गावचे पोलीस पाटील व इतर मंडळींनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो दिसून आला नाही. 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. गावातील सातीवणीच्या विहिरीच्या काठावर विष्णू याचा रुमाल दिसून आला. विहिरीजवळ जावून पाहिले असता विष्णू यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याबाबत मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.