काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, मंडणगड तालुक्यात साेमवारी झालेली गर्दी पाहता, लाॅकडाऊनचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यात तालुका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे जनता व व्यापारी बिनधास्त असल्याचे पाहायला मिळाले. प्रशासनाकडून कारवाई होत नाही, म्हणून जीवनावश्यक वस्तूंबरोबरच शहरातील अन्य दुकानेही सुरू आहेत. शहरासह गावातील दुकाने ११ नंतरही सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे