(पुणे)
भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. ही मुले शिरूर तालुक्याच्या कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीतील आहेत. गौरव स्वामी (16), अनुराग मांदळे (16) अशी त्यांची नावे आहेत.
वस्तीवरील पाच ते सात मुले भीमा नदीत पोहण्यास गेली असता त्यातील ही दोन मुले पाण्यामध्ये अचानक दिसेनाशी झाल्याने इतर मुलांनी गावात जाऊन ग्रामस्थांना कळविले. ग्रामस्थांनी पाण्यात उतरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस, अग्निशमन दलाचे जवानासह रुग्णवाहिका दाखल झाल्या. दुपारी चारपासून अग्निशमन दलाचे जवान पाण्यात मुलांचा शोध घेण्यास उतरले. उशिरापर्यंत या मुलांना शोधण्याचे काम सुरु होते.