(मुंबई / सुरेश सप्रे)
देवरुखला १९८८ च्या दशकात शिवसेना संघटना मजबूतीसाठी तत्कालिन तालुका प्रमुख रविंंद्र माने यांचे सह अहोरात्र झटणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणून ओळख असणा-या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातुन मोठा जनसंपर्क तयार करणा-या मनोज पर्शुराम कदम यांचे काल दु:खद निधन झाले.
निधन समयी त्यांचे वय ५२ होते. १९९० साली महाविद्यालयीन शिक्षणाकरीता मुंबईहुन देवरुखला आलेल्या मनोज कदम यानी अल्पावधीतच आपल्या स्वभावामुळे देवरुखात स्वत:चे स्थान निर्माण केले. कालांतराने शिवसेंच्या विद्यार्थी सेनेचे काम सुरु केले. भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. त्यानी ती समर्थपणे पार पाडली. जिल्ह्यात विद्यार्थी संघटना मजबूत केली. शिवउद्योग सेनेच्या जिल्हा कार्यालयची उभारणीत मोठे योगदान देत जिल्हातील बेरोजगारीची नोंदणी करून अनेकांना मदतीचा हात दिला..
देवरुखजवळील आंबवचे सुपुत्र असणा-या मनोज कदम यांचा तालुक्यात मोठा मित्र परिवार आहे. गेल्या काही वर्षापासून ते नोकरीनिमित्ताने मुंबईत वास्तव्याला होते. काल मुंबईतच चुनाभट्टी येथील घरी त्यानी अखेरचा श्वास घेतला