(रत्नागिरी)
भाजपा प्रदेश चिटणीस सोशल मीडिया प्रभारी श्वेता शालिनी आज सोमवार दि.8 रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर बूथ सक्षमीकरण अंतर्गत सोशल मीडिया सेल अधिक प्रभावी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
रत्नागिरी मधील भाजपाच्या सोशल सेलची महत्वपूर्ण बैठक श्वेता शालिनी यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख पदाधिकारी सोशल मिडिया संयोजक यांचेबरोबर भाजपा कार्यालयात सकाळी 11 वाजता ही महत्वपूर्ण बैठक होणार असून श्वेता शालिनीजी सोशल मीडिया प्रभावी करण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत.
श्वेता शालिनी यासारख्या प्रदेशातील महत्वपूर्ण पदाधिकारी रत्नागिरीत येऊन बैठक घेत आहेत याचे खूप महत्व आहे. सोशल मीडिया प्रभावी करण्यासाठी आवश्यक रचना तसेच मार्गदर्शन यातून कार्यकर्ते प्रभावी माध्यमाच्या वापरासाठी तयार व्हावेत म्हणून हे मार्गदर्शन मोलाचे ठरणार असल्याचे असे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी सांगितले.