(संगलट / इक्बाल जमादार)
दापोली तालुक्यातील वेळवी परिसरात आज (दि.३० जानेवारी रोजी) भर दुपारी वणवा लागल्याने वनसंपदेची अपरिमीत हानी झाली आहे. अनेक वृक्ष आणि माळरान बेचिराख यामुळे झाले आहे.
या वणव्यामुळे निसर्गसाखळी तुटून निसर्गचक्रावर विपरित परिणाम होतो. असे वारंवार लागणारे वणवे थांबवण्यासाठी वणवा मुक्त गाव संकल्पना अंमलात आणणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण प्रेमी निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केले आहे. तसेच नागरिकांनी वणवे रोखण्यासाठी आणि वणवे लागूच नयेत यासाठी कृतीशील होणे काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त केले आहे.