(रत्नागिरी)
येत्या १२ डिसेंबरला,नागपुरात राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य असा पेन्शन जनक्रांती महामोर्चा होणार आहे.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या शिष्टमंडळाने आज सकाळी ९ वा. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या विजयगड या निवासस्थानी भेट घेतली. जुनी पेन्शन बाबत आपली ठाम भूमिका असून महामोर्चा माघार होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की आम्ही जुन्या पेन्शनसाठी पूर्णतः सकारात्मक आहोत. समितीचा अहवाल प्राप्त झाला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.यावर संघटना शिष्टमंडळाने हा तारीख पे तारीख चा सिलसिला न थांबणारा असल्याने पेन्शन लढा अविरत सुरूच असणार,हे निदर्शनास आणून दिले.
राज्य शासनाने, जुनी पेन्शन बहाली बाबत अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा ठाम निर्णय घेतला नसल्याने १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या पेन्शन जनक्रांती महामोर्चावर संघटनेसहित राज्यातील लाखो कर्मचारी ठाम असल्याचे सांगितले.आतापर्यंत राज्यभरातील ३५ कर्मचारी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला असून किमान ८ ते १० लाख कर्मचाऱ्यांचे पेन्शन वादळ नागपुरात १२ तारखेला धडकणार असल्याचे सांगितले.तसेच सदर भेटीदरम्यान वोट फॉर ओपीएस च्या कव्हर मध्ये लोकमत दिवाळी उपमुख्यमंत्री यांना भेट देण्यात आला.
नागपूर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हाजी.मो.युसुफ सेठ पुंजानी,संघटना राज्यसचिव गोविंद उगले,प्रवीण बडे,मिलिंद सोळंकी यांनी विशेष मदत केल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,राज्यकार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, राज्यसल्लागार सुनील दुधे, वाशिम जिल्हाध्यक्ष निलेश कानडे, राज्य समन्वयक गोपाल लोखंडे, वाशिम जिल्हा संघटक इकराम आदी उपस्थित होते.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने 12 डिसेंबर च्या पेन्शन जनक्रांती महामोर्चा नागपूर येथे होणार आहे या मोर्चाला रत्नागिरी जिल्ह्यातून जास्तीत जास्त NPS धारकांनी उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अंकुश चांगण, जिल्हा सचिव श्री दत्तात्रय क्षिरसागर, आरोग्य विभागाचे श्री. कमलेश कामतेकर यांनी केले आहे.