(डिजिटल टेक्नॉलॉजी)
पॅनकार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज आहे. पॅन कार्डचा वापर आजकाल सर्वत्र गरजेचा झाला आहे. मालमत्ता खरेदी करण्यापासून ते दागिने खरेदी करणे, बँकेत खाते उघडणे, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे, आयकर रिटर्न भरणे इत्यादी सर्वत्र केले जाते. पॅन कार्डशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू शकत नाही. हल्ली सर्वच नागरिकांकडे Pan Card असणे अत्यंत आवश्यक असून हे कार्ड आयकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केले जाते, यात एक १० अंकी युनिक क्रमांक असतो. ज्यामध्ये तुमचे सर्व वैयक्तिक तपशील दिले जातात. हा 10 क्रमांकाचा युनिक आयडी आहे ज्यामध्ये आपली मिळकत आणि कराचा संपूर्ण तपशील नोंदवला जातो. पॅन कार्डच्या उपयुक्ततेमुळे त्याची सर्व माहिती अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
पण अनेक वेळा पॅनकार्ड बनवताना तांत्रिक बिघाडामुळे अनेकांचा फोटो खराब होतो किंवा अस्पष्ट होतो कींवा कालानंतराने फोटो जुना होतो. कार्ड बनवतानाच अनेक वेळा पॅन कार्डचा फोटो अस्पष्ट असतो. अशा परिस्थितीत, अनेक वेळा फोटो जुळत नसल्यास तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागतो. आपलाही Pan Card वरील फोटो स्पष्ट नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण, आता तुम्ही फोटो अगदी सहजपणे अपडेट करू शकता. आपणच आपला पॅन कार्डवरचा फोटो कसा बदलू शकतो याची माहिती घेऊ.
फोटो बदलण्यासाठी तुम्ही प्रथम NDLS च्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा. येथे तुम्हाला Application Type या पर्यायावर क्लिक करावे लागेल. Correction and Changes या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल. येथे तुम्हाला नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक इत्यादी सर्व तपशील विचारले जातील, जे तुम्हाला भरावे लागतील. यानंतर, कॅप्चा भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. पुढे येथे तुम्हाला केवायसी करावे लागेल.
केवायसी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला फोटो बदलण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर आयडी प्रूफ डिपॉझिट अपलोड करा आणि यानंतर डिक्लेरेशन पर्यायावर क्लिक करा. यानंतर फोटो बदलण्यासाठी तुम्हाला 101 रुपये जमा करावे लागतील. तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी कोणत्याही पद्धतीद्वारे पेमेंट करू शकता. यानंतर, 15 क्रमांकाचा नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. तो क्रमांक सेव्ह करून त्याची प्रिंटआऊट काढून ठेवा. यानंतर, हा नंबर इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिसेस युनिटला पाठवा. तुमचा फोटो पॅनमध्ये अपडेट केला जाईल. तुम्ही या एक्नॉलेजमेंट नंबरसह तुमचा अर्ज देखील ट्रॅक देखील करू शकता.