न्यूझीलंडने विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. बांगलादेशचा पराभव करून त्यांनी सलग तिसरा विजय नोंदवला. किवी संघाने यापूर्वी इंग्लंड आणि नेदरलँड्सचा पराभव केला होता. आता त्यांचे तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. यासह किवींनी पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा हा दुसरा पराभव आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर त्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आता त्याचे तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. यासह पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड संघानं पहिले स्थान कायम राखलं आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा हा दुसरा पराभव आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर त्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने 50 षटकांत नऊ गडी गमावून 245 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने 42.5 षटकात 2 बाद 248 धावा करत सामना जिंकला.
न्यूझीलंडकडून फलंदाजीत डॅरेल मिशेलने सर्वाधिक नाबाद 89 धावा केल्या. मिशेलने 67 चेंडूत 6 चौकार अन् 4 षटकाराच्या मदतीने 89 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. कर्णधार केन विल्यमसनने 107 चेंडूत 78 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार अन् 1 षटकार लगावला. तो दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. डेव्हॉन कॉनवेने 45 धावांचे योगदान दिले. रचिन रवींद्र नऊ धावा करून बाद झाला. ग्लेन फिलिप्सने नाबाद 16 धावा केल्या. मुस्तफिजुर रहमान आणि शाकिब अल हसन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
The New Zealand juggernaut rolls on with a third consecutive win at #CWC23 🙌#NZvBAN 📝 https://t.co/SYge6mt66w pic.twitter.com/mdREUucGA5
— ICC (@ICC) October 13, 2023