(रत्नागिरी)
शहरानजीकच्या नाचणे बसस्टॉपजवळ तरुणाच्या गळ्यातील चेन जबरदस्तीने काढून घेणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी (४ ऑगस्ट) न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अद्वैत संदेश चवंडे, रौफ इक्बाल डोंगरकर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी दुपारी ते नाचणे बसस्टॉपजवळ उभे असताना अद्वैत चवंडे आणि रौफ डोंगरकर हे दोघे तिथे आले. अद्वैतने फिर्यादीला तुझ्या गळ्यातील चेन मला दे असे ओरडून सांगून रौफने खांद्यावर हात ठेवून चेनचा फासा काढला. फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच दोघांनी दुचाकीवरुन पळ काढला होता.
याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही संशयितांना शुक्रवारी अटक करुन न्यायालयात हजर केले.न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.