(खेड)
गुरुवर्य श्री.ग.रा. चिकणे गुरुजी प्रतिष्ठान खेड व दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने पॅरा कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने दिनांक २२ व २३ एप्रिल २०२३ रोजी स्वर्गीय किशोरजी कानडे क्रीडांगण खेड येथे दिव्यांग कबड्डी खेळाडूंच्या भव्यदिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरीता दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाची निवड आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत अध्यक्ष दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी वतीने करण्यात आली.
जिल्हा संघाच्या कर्णधार पदी रोहित शितब, उपकर्णधार पदी दीपक फुटक, खेळाडू सागर आईनकर, संजीव पोढकर, अल्पेश तावडे, प्रविण साबळे, भरत घेवडे, आरुष चोंणकर, राहुल बरे, संघ व्यवस्थापक जनार्धन पवार, प्रशिक्षक राकेश बैकर यांची निवड करण्यात आली आहे. वरील संघ हा दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेकरीता रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. खेळाडूंच्या निवडीबद्दल खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.सतिश उर्फ पप्पूशेठ चिकणे व दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या सर्व पदाधिकारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.