(रत्नागिरी/विशेष प्रतिनिधी)
दार उघड बये दार उघडं ! म्हटलं की, डोळयासमोर उभे राहतात ते महिलांचे आवडते भावोजी आदेश बांदेकर. महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेला शो महामिनिस्टर (होम मिनिस्टर) आज रत्नागिरी येथील सावरकर नाटयगृहात निवड चाचणी होत आहे. या पार्श्वभूमीवर साडेअकरा लाखाची पैठणी मिळवण्यासाठी आणि रत्नागिरीच्या महामिनिस्टर होण्यासाठी सकाळी 7.30 वाजल्यापासून सावरकर नाटयगृहापासून फे्रन्डस चायनिज सेंटरपर्यंत महिलांच्या रांगा लागल्या आहेत. महिलांचा उत्साह दिसून येत आहे. बांदेकर भावोजींना पाहण्यासाठी महिलांचे डोळे लागलेले आहेत. निवड चाचणीनंतर आता कोण महिला रत्नागिरीची महामिनिस्टर होणार आहे हे पाहणी औत्सुक्याचे ठरणार आहे.