( प्रतिनिधी /दापोली )
दापोली तालुक्यातील कोंढे येथे एका गुरांच्या गोठ्यात बिबट्याचा मृत्यू झाला होता. कोणत्या कारणाने त्या बिबट्याचा मृत्यू झाला याचा वनविभाग तपास करत होते. वनविभागाचे वनाधिकारी वैभव बोराटे, वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक यांनी मृत बिबट्याची पाहणी केली होती. मात्र बिबट्यावर कोणत्याही प्रकारच्या खुणा नाही की शरिरावर कोणत्याही प्रकारची जखम नव्हती. शिवाय त्याचे सर्व अवयव शाबूत होते. त्यामुळे भुकेने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त होत आहे.
या मृत बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल आला की नेमके कारण स्पष्ट होईल, असे देखील वनाधिकारी वैभव बोराटे यांनी सांगितले.