(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे येथे थर्टी फस्ट व नववर्षाचे स्वागत याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात थर्टी फस्ट व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज बांधण्यात येत असून यावेळी कोणतीही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी जयगड पोलीस ठाणे मार्फत चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. येथील आपटा तिठा हे तीर्थक्षेत्राचे मुख्य प्रवेशद्वार असल्यामुळे या ठिकाणी बाहेरगावातून येणाऱ्या चारचाकी कार, टू व्हीलर तसेच इतर छोटी मोठी वाहनांची कसून चौकशी व तपासणी करताना पोलीस कर्मचारी दिसून येत होते. तसेच आपटा तिठा बरोबरच कोल्हटकर तिठा, सुर्वे स्टॉप, बस स्थानक,मोरया चौक आदींसह समुद्र चौपाटी आदी ठिकाणी पोलीस होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवून राहणार आहेत.
थर्टी फस्ट ला होणारी गर्दी लक्षात घेता समुद्र चौपाटीवर ग्रामपंचायत गणपतीपुळे चे जीव रक्षक,संस्थान गणपतीपुळे चे सुरक्षारक्षक आदींसह पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करणार आहेत. या कामी येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी रत्नागिरी मुख्यालय व वाहतूक पोलीस बोलवण्यात येणार आहेत. एकंदरीतच होणाऱ्या गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
सागरी जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती क्रांती पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव, पोलीस जयेश किर,यांच्या सह रत्नागिरी होमगार्ड रत्नागिरी येथून आलेले पोलीस कर्मचारी,वाहतूक शाखेचे कर्मचारी आदी मोठी मेहनत घेताना दिसत आहेत.