(चिपळूण)
डॉ. पांढुरंग मोहिते हे -WHITE GRUB (हुमणी अली) यावर संशोधन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांपैकी ते एक आहेत आणि आपल्या भारत सरकारद्वारे त्यांना उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी पंडित जवाहरलाल राष्ट्रीय सुवर्ण पदक दिले आहे. तसेच भीमा पुरस्कार, कोल्हापूर येथील रोटरी क्लबद्वारे आदर्श शिक्षक आणि असेच अनेक पुरस्काराचे ते मानकरी ते आहेत. अतिशय मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे असे, त्यांच्या संबंधित क्षेत्रातील प्रचंड ज्ञान आणि कामाचा अनुभव असेलेले असे थोर व्यक्तिमत्व ते आहेत.
कृषीरत्न गटाच्या सोबत येऊन डॉ. पांढुरंग मोहिते यांनी तुरंबव गावातील शेतकऱ्यांशी तसेच ग्रामस्थांशी भातावरील किटक व किडी याविषयी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि तसेच कृषी संबधित इतर समस्याही जाणून घेतल्या. तसेच गावाजवळील कृषी महाविद्यालय हे त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांच्या कृषी विषयक अडचणी सोडवण्यास गोविंदरावजी निकम महाविद्यालय हे त्यांना मार्गदर्शन व मदत करेल असे आश्वासनसुध्दा त्यांनी ग्रामस्थांना दिले. प्रथमच गावात असा कार्यक्रम झाल्यामुळे ग्रामस्थाचा आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला जवळपास 60 शेतकऱ्यांची उपस्थिती होते. पुन्हा या सारखे कार्यक्रम आमच्या गावात घ्या अशी मागणी त्यांनी कृषिरत्न गट व मोहिते यांनी करत ग्रामस्थांनी त्यांना निरोप दिला.