[ नवी दिल्ली ]
गुजरात दंगलीनंतर सरकारविरोधात कट रचल्याच्या आरोपांखाली मागील २ महिन्यांपासून अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सशर्थ अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गुजरात दंगलप्रकरणी सरकारविरोधात खोटे आरोप करणे, खोटी कागदपत्रे तयार करून अनेकांना त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करणे, असा आरोप सेटलवाड यांच्यावर ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत, न्यायामूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू भट यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.