(देवरुख / वार्ताहर)
तिवरे तर्फे देवळे ग्रामपंचायत येथे १५ वा वित्त आयोग अंतर्गत महिला कौशल्य प्रशिक्षण पार पडले. या शिबीरात महिलांना विविध प्रकारच्या मेणबत्या, अगरबत्ती, फिनेल, साबण, लिक्विड आणि स्टॉकिंगची फुले बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमाला पन्नासहुन अधिक महिलानी सहभाग नोंदवला होता. गावातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज फाउंडेशन दापोली यांच्याकडून हे प्रशिक्षण देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत तिवरे तर्फे देवळे आणि सावित्री ग्रामसंघ यांनी मेहनत घेतली. या शिबिराचा गावातील महिलांना उत्तम उपयोग होणार आहे. गावातील महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.
या कार्यक्रमाला सरपंच संतोष कांबळे,उपसरपंच ओंकार सुर्वे, ग्रामसंघ अध्यक्ष श्रद्धा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य व सचिव अमृता गावडे, सिआरपी प्राची सुर्वे, कोषाध्यक्ष अरुणा गोरुले, आदींनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात येतील ज्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळेल असे ग्रामपंचायत तिवरे तर्फे देवळे यांच्याकडून सांगण्यात आले.