(क्रीडा)
टेनिस जगताचा बादशहा असलेला दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याने गुरुवारी, 15 सप्टेंबरला खेळातून संन्यास घेणार असल्याचे जाहीर केलं. 41 वर्षीय फेडरर आगामी लेवर चषक स्पर्धेत शेवटचं खेळताना दिसणार आहे. फेडररच्या करिअरमधील एटीपी टूर्नामेंट अखेरच असणार आहे. फेडररने ट्विट करून याची माहिती दिली आहे. तब्बल २० ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा खेळाडू म्हणून फेडररने विक्रम केला. मात्र लेव्हर कप २०२२ नंतर तो या खेळातून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. अचानक निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला आहे.
लंडनमध्ये पुढील आठवड्यात आयोजित लेवर चषक स्पर्धा ही माझा करिअरमधील शेवटची असेल. मी भविष्यात आणखी टेनिस खेळणार आहे, निश्चितच, पण ग्रँड स्लॅम किंवा दौऱ्यावर नसेल, असे देखील रॉजर फेडररने सांगितलं आहे.
रॉजर फेडरर पुढे म्हणाला, ‘तुम्हा सगळ्यांना माहित आहेच. गेलेली तीन वर्षे दुखापत आणि सर्जरीमुळे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक ठरले. मी स्पर्धांमध्ये कामगिरी सुधारण्यासाठी खूप परिश्रम घेतले. परंतु, शरीर साथ देत नव्हतं. कारण त्याच्याही काही मर्यादा आहेत. मी आता 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1500 हून अधिक सामने खेळले. आता माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपवण्याची वेळ आली आहे.’