दापोली-दाभोळ मार्गावरील जालगाव ते मळे गावांदरम्यान आम.योगेशदादा कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने वन विभाग दापोलीकडून लोकसहभागाच्या सहा्ययाने कृषी दिनाचे औचित्य साधत तब्बल एक हजार रोपांच्या वृक्ष लागवडीच्या कामाचा शुभारंभ वळणे एमआयडीसी येथील रस्त्याकडेला आम.योगेश कदम यांच्याहस्ते काजूचे रोप लावून करण्यात आला.
यावेळी दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, दापोलीचे परिमंडळ वन अधिकारी साताप्पा सावंत, शिवसेना तालुका प्रमुख प्रदिप सुर्वे, वनरक्षक गणपत जळणे, वनरक्षक महादेव पाटील, वनरक्षक सुरज जगताप, वनरक्षक शुभांगी गुरव, दापोली तालूका शेतकरी लाकुड व्यापारी संघाचे अध्यक्ष देवचंद जाधव, राम शिरगावकर, रोहीत मेहता आदी उपस्थित होते.