(रत्नागिरी)
जाधव फिटनेस ॲकेडमीच्या माध्यमातून उद्योग मंत्री उदय सामंत “गाव तेथे व्यायामशाळा” ही संकल्पना राबवली जाणार आहेत. मुलांमध्ये वाढत चाललेला मोबाईलचा अति वापर, फिटनेस संबंधी असलेली उदासीनता तसेच नवीन पिढी शिवाजी महाराजांच्या आरमारातील मावळ्यांसारखी निरोगी तंदुरुस्त बनवण्यासाठी सदर योजना राबवली जाणार आहे. जाधव फिटनेस ॲकेडमी अशाच सामाजिक उपक्रमासाठी स्थापन झाली असून या ॲकेडमी अध्यक्ष भैय्याशेठ सांमत आहेत व सचिव हेमंत जाधव आहेत.
जाधव यांनी याबाबत प्रस्ताव दिला होता. नुकत्याच झालेल्या मंत्री सामंत यांच्या दौऱ्यात हेमंत जाधव यांनी सदर योजनेची माहिती देऊन संकल्पना पटवून सांगितली. आता चालू असलेल्या क्रीडा आँफीस योजनेत काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी दुर करुन नवीन योजना राबवायची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बेळगावचे आमदार अभय पाटील यांनी ज्याप्रमाणे सदर योजना राबवून 5 कोटी निधीचे वेगवेगळ्या मंडळांना व्यायाम साहित्यासाठी वाटप केले तशाच प्रकारची ही योजना असल्याचे ते म्हणाले. मंत्री सामंत यांनी त्वरीत निर्णय घेत आपल्या निधीतुन करबुडे, भोके व अन्य ठिकाणी या योजनेतून व्यायाम साहित्य देऊन सुसज्ज व्यायामशाळा उभारण्यास पी.ए.नेताजी पाटील यांना सांगुन याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले.
मंत्री सामंत यांचेतर्फे सदर व्यायाम शाळांना जाधव फिटनेस ॲकेडमीचे सुसज्ज व आधुनिक व्यायाम साहित्य देणार आहे, ज्यावर जाधव फिटनेस चा लोबो व फोन नंबर असेल. व्यायामशाळा चालवण्यासाठी लागणारे जिम ट्रेनरचे प्रशिक्षण व व्यायाम साहित्याचा मेंटेनन्स ॲकेडमी तर्फे मोफत केला जाणार आहे. या योजनेतुन मिळणारा नफा खेळांच्या विविध ॲक्टिव्हिटीसाठी वापरला जाणार आहे. तरी मंत्री सामंत यांच्या मतदारसंघात अशाप्रकारच्या व्यायामशाळा कोणाला चालू करायच्या असल्यास जाधव फिटनेस ॲकेडमी, क्रीडा आँफीस अथवा पी.ए.नेताजी पाटील यांच्याकडे संपर्क साधावा, असे आव्हान हेमंत जाधव यांनी केले आहे.