(जाकादेवी / वार्ताहर)
थोर आदर्श राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा होणार असून हा जन्मोत्सव सोहळा पंचक्रोशीतील लक्षवेधी ठरणार आहे.
या जयंतीनिमित्त १९ रोजी सायंकाळी ४.३०वा. भव्य शोभायात्रा परिसरात लक्षवेधी ठरणार आहे.सायंकाळी ५ वा.जाकादेवी मुख्य बाजारपेठ येथे लाठी-काठी व साहसी खेळ प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वा. आदर्श राजे छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वागत सोहळा होणार आहे. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत परिसरातील विद्यार्थ्यांची क्रांतिकारक भाषणे व बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे .
या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मराठा समाजातील नेते दत्तात्रय उर्फ काका देसाई, अरुण जाधव, सुनिल पाटील, अमर देसाई, संकेत उर्फ बंड्या देसाई, प्रतिक देसाई, महेश देसाई, बाबूशेठ पवार, सुधीर देसाई, हनुमंत कदम,पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच यांसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी परिसरातील नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी केले आहे.हा प्रेरणादायी उत्सव जाकादेवी येथील कोंकण गारवा हॉटेलच्या पटांगणात होणार आहे.