( जाकादेवी /वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी येथे भारतीय थोर आद्य शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी प्रमुख वक्त्या सौ. वैष्णवी साळुंके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्य अभ्यासपूर्ण भाषणातून प्रकट करून त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श पैलूंचे दर्शन घडविले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ शिक्षक भूपाल शेंडगे, तुकाराम दरवजकर, नामदेव वाघमारे, शाम महाकाळ, केशव राठोड, योगेश चव्हाण, शिवानंद गुरव, अनिल पाटील, सुशांत लाकडे, सौ.साळुंके सौ.परकर, सौ.पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार यांनी तर आभार सुशांत लाकडे यांनी मानले.