(रत्नागिरी)
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाला शैक्षणिक उठावाअंतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी- सुविधांकरिता येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली.
चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांच्यासह सदस्य अविनाश काळे, वसतीगृहाचे व्यवस्थापक रविकांत शहाणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला. याप्रसंगी वरिष्ठ लिपिक श्री. व्हटकर, श्री. मळेकर यांच्यासमवेत मान्यवर उपस्थित होते. एसटी स्टॅंडसमोरील जांभेकर विद्यालय हे रत्नागिरीतील जुने विद्यालय असून शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे या शाळेच्या कार्याबद्दल चित्पावन ब्राह्मण मंडळाने मदत देण्याचे ठरवले.