(दापोली (पालगड) /वार्ताहर)
अलिबाग, रायगड येथे चौथी राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे दक्षिण रायगडचे आमदार महेंद्र दळवी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे दक्षिण रायगडचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, इंडिया ऑर्गनायझेशनचे महागुरू सुभाष मोहिते, राष्ट्रीय अध्यक्ष अजय शहा, अलिबाग रायगडचे लाठी असोसिएशनचे सचिव प्रियंका गुंजाळ आदि मान्यवर यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
14 वर्षाखालील मुलींच्या गटात सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी दापोलीच्या इयत्ता सहावीत शिकणारी मुग्धा विरेश चव्हाण हिने ‘द्वे लाठी’ प्रकारात सुवर्णपदक तर इयत्ता पाचवीत शिकणारी वेदश्री शैलेश भांबुरे हिने ‘एकम लाठी’ प्रकारात सुवर्णपदक संपादन केले, तर मुग्धा चव्हाण आणि सताक्षी देसाई हिने ‘द्वे’ आणि ‘काह’ या संयुक्तिक लाठी प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले तर वेदश्री भांबुरे हिने ‘काट पवित्रा’ या लाठी प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रीतु मेहता, संस्थाध्यक्ष सुजय मेहता शाळेचे क्रीडाशिक्षक संदेश चव्हाण, शाळेचे शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या दोन्ही खेळाडूंची 6 जानेवारी 2024 रोजी हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या खेळामध्ये त्यांना त्यांचे प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.