(मुंबई)
सेलिब्रीटीजच दिसणं, चालण, उठणं, बसणं, लग्न आणि मुलं अशा प्रत्येक गोष्टींची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ असते. त्यांना या बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्यात फार रस आणि आवड असते. रविवारी आलियाची डीलिव्हरी झाली अन तिने एका चिमुकलीला जन्म दिला. साहजिकच ही बातमी वा-यासारखी पसरली.
आलिया-रणबीरचं लग्न, त्यांचे फोटोज फार गाजले होते. त्यांचं लग्न होणार हे चाहत्यांना ठाऊक असलं तरी तारीख ऐन वेळेवर जाहीर होत अगदी छोटेखानी हा लग्नसोहळा रंगला होता. त्यानंतर काही महिन्यातच आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ती “आई” होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली.
रविवारी आलियाची डिलीव्हरी झाल्यावर मात्र मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करतच नेटकऱ्याबाबत एक वेगळीच बाब समोर आली. गुगलवर आलिया आणि रणबीरच्या लेकी पेक्षा त्यांच्या लग्नाची तारीख शोधण्यात लोकांना अधिक रस असल्याचं दिसत आहे. आलिया रणबीरचं लग्न कधी झालं आणि त्यांना मुलं कितव्या महिन्यात झालं याचं समिकरण जुळवण्याच चाहत्यांना रस असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर, या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाउंटवर सोनोग्राफी रुममधील फोटो शेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं.
काल सकाळीच आलियाला मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी भरती करण्यात आले होते. दरम्यान, आलियाने आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला आहे. आलिया आणि तिच्या बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर भट आणि कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
आलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर आलिया आणि रणबीरची पहिली भेट झाली. आलियाने काही महिन्यांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करून आलियाने त्याला, ‘आमचे बाळ लवकरच येत आहे’, असे कॅप्शन दिले होते.