( चिपळूण / प्रतिनिधी )
तालुक्यातील बुरुमतळी येथे हॉटेलचे शेडमधील इलेक्ट्रीक ग्रेव्ही मशिनने काम करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रमोद परशुराम शिंदे (29, गोपाळकृष्णवाडी, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर रवींद्र गायकर (46, परशुरामनगर, चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद शिंदे हा सद्गुरु हॉटेल येथे किचन हेल्पर म्हणून 4 वर्ष कामाला होता. 17 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वा. च्या सुमारास हॉटेलमधील शेडचे काम करत असताना अचानक इलेक्ट्रीक शॉक लागून बेशुध्द पडला. त्याला चिपळूण बुरुमतळी विठाई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.