(रत्नागिरी)
शहरातील मच्छीमार्केट ते चर्चरोडवर विनापरवाना हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ५५० रुपयांची १० लिटर दारू जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्फराज अहमंद शहा (वय ३६, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
सदर घटना मंगळवारी (ता. १२) सायंकाळी मच्छीमार्केट ते चर्चरोड जाणाऱ्या रस्त्यावर पालिका शाळा क्र. १४ च्या पडिक इमारतीच्या मागील बाजूस निदर्शनास आले. या कारवाईत संशयिताकडे विनापरवाना ५५० रुपयांची १० लिटर दारू जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.