(संगमेश्वर)
पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली घोडवली गावाच्या विकासासाठी श्री किरण सामंत, सामाजिक कार्यकर्ते व उप तालुका प्रमुख मनोहर गुरव, जि.प.देवरूख ओझरे खुर्द (संगमेश्वर) गट यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी घोडवली हनुमान मंडळाचे खजिनदार श्री. किशोर बने, माजी.सेक्रेटरी श्री दशरथ बने, ग्रामपंचायत उपसरपंच सौ. भाग्यश्री बडद, ग्रामपंचायत सदस्य श्री विजय मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री गणपत घडशी, घोडवली बौद्ध वाडी महासंघ चे अध्यक्ष श्री शंकर कांबळे, घोडवली गावचे ग्रामस्थ श्री विलास बने, श्री दत्ताराम बने, रणजित बने, अजित बने, आण्णा मांडवकर, राजु शिंदे, संदीप मांडवकर, नवनाथ शिंदे, चांदिवणे गावचे ग्रामस्थ श्री रामचंद्र शिंदे, प्रकाश शिंदे व इतर ग्रामस्थ व महिला वर्ग अशा 40 नागरिकांनी प्रवेश केला. या मध्ये महिला वर्गाचा सहभाग मोठा होता. यावेळी श्री किरण सामंत यांना घोडवली गावाच्या विकासासाठी अनेक विषयांवर ग्रामविकास मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.