आंबोली ( सिंधुदुर्ग) येथील अनेक ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या त्या कोळसुदा या प्राण्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यावेळी त्या प्राण्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून १०-१२ तासाची मोहीम राबवावी लागली आहे. या प्राण्याने नागरिकांवर हल्ला करत जखमी केले होते. त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने यासाठी “फिल्डिंग” लावून सायंकाळी उशिरा कले या प्राण्याला जेरबंद या प्राण्याने सुमारे १३ जणांवर हल्ला करत जखमी केले. यात गावठणवाडीतील एका आठ वर्षाच्या बालकावरही हल्ला केला होता._