(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद खानविलकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत ही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मिलिंद खानविलकर यांनी सरपंच पदही भूषवले आहे. त्याच बरोबर यापूर्वीही तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. खानविलकर यांचा दांडगा जनसंपर्क असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. कधी ही कोणाला कसली अडचण आली तर आपल्या जीवाची पर्वा न करता मिलिंद खानविलकर मदतीसाठी धावत असतात.कोरोना काळात ही उत्तम कामगिरी बजावली आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सरपंच सौ.किरण जाधव, उपसरपंच मंगेश नागवेकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, पोलिस पाटील अनिल जाधव, माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.