(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.पांडुरंग सीताराम लघाटे कक्षामार्फत झालेल्या जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत मोठ्या गटातून, रत्नागिरीच्या सार्था गवाणकर हिने प्रथम तर लहान गटातून सावर्डे येथील अनन्या खेराडे हिने प्रथम क्रमांक पटकवला.
मोठ्या गटातून सृष्टी तांबे (सावर्डे) हिने द्वितीय, अर्णव सरपोतदार (रत्नागिरी) याने तृतीय क्रमांक पटकावला. तर लहान गटातून ऋग्वेद तेरेदेसाई (रत्नागिरी) द्वितीय तर मुक्ता आंबेकर (दापोली) हिने तृतीय क्रमांक मिळवला. प्रत्येक गटातून क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. महाआंतिम सोहळ्यात लहान गटातून प्रत्येकी दोन गाणी सादर करण्यात आली.तर मोठ्या गटातून स्पर्धकांनी प्रत्येकी तीन गाणी सादर केली. स्पर्धकांची उत्तरोत्तर गाणी रंगत गेल्याने स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर पोहचली. निकाल देताना परीक्षकांचा कस लागला.
महाआंतिम सोहळ्याला माखजन इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी आणि आजचा आघाडीचा गायक प्रथमेश लघाटे उपस्थित होता. उपस्थितांच्या आग्रहास्तव त्याने तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हा अभंग गाऊन उपस्थितांची मने जिंकली.
जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेत दापोली, रत्नागिरी, माखजन केंद्रावरुन एकूण १८० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील २५ स्पर्धक उपांत्य फेरीसाठी निवडण्यात आले होते. उपांत्य फेरी मध्ये प्रत्येक गटातून तीन तीन स्पर्धक निवडण्यात आले होते. उपांत्य फेरी आणि महाआंतिम सोहळ्याचे परीक्षण जान्हवी खडपकर,.अमृता तांबे, व संजय फगरे यांनी केले. तर साथ संगत मध्ये तबल्यासाठी प्रथमेश देवधर, सुरज पाटणकर ऑर्गनची साथ चैतन्य पटवर्धन, विशारद गुरव, टाळसाथ प्रसन्न लघाटे, पखवाज मिलिंद लिंगायत, व्हायोलीन साथ श्री शिधये यांनी केली. तर हार्मोनियम साथ आनंद लिंगायत यांनी केली. तर ध्वनीव्यवस्था प्रशालेचे माजी विद्यार्थी उमेश फाटक व प्रकाश योजना नाना जाधव, सुनील घडशी या माजी विद्यार्थ्यांनी पाहिली.
महाआंतिम सोहळ्यावेळी सामाजिक कार्यकर्ते युयूत्सू आर्ते,श्रीकांत फाटक, दिलीप जोशी, श्रीकांत लघाटे, मनोहर साठे, मा.पं.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष आनंद साठे, मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर, चंद्रकांत सावर्डेकर, माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सभासद, माजी विद्यार्थी, संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महाआंतिम सोहळ्याचे निवेदन सौ मृदुला खरे हिने केले तर सूत्रसंचालन व आभार गौरव पोंक्षे यांनी मानले.