(रत्नागिरी/प्रतिनिधी)
एकीकडे पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढताहेत तर दुसरीकडे तेलांच्याही किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. रुची तेलपिशवी 1 लिटरला 155 रुपये मोजावे लागत आहेत. तर सूर्यफुल तेलपिशवी 170 रुपये झाली आहे. जेमिनी 195 लीटर झाली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांचे दरही बाजारात वाढवले जात आहेत. बेकरी पदार्थांमध्ये वाढ झालेली आहे. गहू, मैदा, डालडा तसेच गॅस दरवाढ यामुळे वडापावच्या किंमती वाढल्या आहेत.
बाजारात चायनीजचे दरही वाढले. आहेत. 10 रुपयांना मिळणारा वडापाव ब रत्नागिरीत 15 रुपये झाला. तर चिपळूणमध्ये हाच वडापाव आता 18 रुपये झाला आहे. ब्रेड 30 रुपये, मस्कापाव 20 रुपयांना 3, कांदाभजी प्लेट 25 रुपये, पॅटीस 18-20 रुपये विकला जात आहे. त्यामुळे टपरीवर वडापाव खायचं म्हटलं तरी खिशात 20 रुपये हवेत. मग हॉटेलमध्ये जायचं म्हटलं तर आपल्या खिशात किती रुपये ठेवायला हवेत याचा विचार न केलेलाच बरा. एकूणच काय तर महागाईनं कंबरडं मोडलं आहे.
पगारात वाढ नाही, महागाईत वाढ भागवायचं कसं!
नोकरी करणार्यांचे पगार वाढत नाहीत मात्र बाजारातील खाद्यपदार्थांचे दर वाढत आहेत. कंपन्या, संस्था, दुकानदार कामगारांच्या पगारात वाढ करताना कोरोनाचे कारण देत आखडता हात घेत आहेत. पगार आहेत तेवढेच आणि महागाई जास्त. त्यामुळे भागवायचं तरी कसं? असा प्रश्न व्याकुळ नोकरदाराने केला आहे.