(रत्नागिरी)
क्रीडा व यूवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद लातूर द्धारा आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्यॉडो स्पर्धेत गणराज तायक्वॉडो क्लब रत्नागिरीची त्रिशा साक्षी सचिन मयेकर- राज्यस्तरीय शालेय तायक्यॉडो स्पर्धेत 17 वर्ष मुली वजनी गट ४४ किलो खालील गटात सुवर्ण पदक तसेच राधिका निशा दर्शन जाधव – राज्यस्तरीय शालेय तायक्यॉडो स्पर्धत 19 वर्ष मुली वजनी ५२ किलो गटात रौप्य पदक प्राप्त केले आहे.
त्रिशाची मध्य प्रदेशमध्ये बैटूल येथे दिनांक 30 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 रोजी ६७ वी राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी त्रिशाची निवड झाली आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी स्पर्धेसाठी ती रवाना होणार आहेत. त्रिशा आणि राधिका या दोघींनी आजपर्यंत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष ठसा मिटवला आहे.
या स्पर्धेकरता गणराज तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष श्री प्रशांत मनोज मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक सौ.आराध्या मकवाना यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्रिशा ही सेक्रट हार्ट धनजी नाका शाळेची विद्यार्थिनी असून राधिका ही जी.जी.पी.एस विद्यार्थिनी आहे. त्रिशाला व राधिकाला तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव करारा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करारा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तालुकाध्यक्ष राम करारा, सचिव शाहरुख शेख, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष प्रशांत मकवांना, गणराज तायक्वांदो क्लबचे उपाध्यक्ष अभिजित विलणकर, सचिव रंजना मोडूळा, कोषाध्यक्ष नेहा किर, साक्षी मयेकर, कनिष्का शेरे, यशंवत शेलार, पुजा कवितके, अनिकेत पवार आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.