(गणपतीपुळे/वैभव पवार)
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्ताने पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, आयोजित सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट आणि मध्य दक्षिणी क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 25 जुलै यादरम्यान राष्ट्रीय चित्रांकन कार्यशाळा ‘केसरी उत्सव’ गणपतीपुळे येथील एम. टी. डी. सी. रिसॉटच्या बांबू हाऊस परिसरात संपन्न झाला. यावेळी दि. 22 जुलै रोजी या कार्यशाळेचे उदघाटन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या शुभहस्ते झाले.
या कार्यशाळेत देशातील विविध राज्यांतून निमंत्रित एकूण पंच्याहत्तर ज्येष्ठ व तरुण प्रतिथयश चित्रकारांकडून लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद या थोर स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनावर आधारित चित्र कलाकृती प्रत्यक्ष चित्रित केल्या गेल्या. केरळ मधील सत्यपाल टी. कोलकाता येथून दिप्तीश घोष, चंदीगड येथील श्री. मदनलाल, मुंबई येथील प्रा. अनिल नाईक, मोगलान श्रावस्ती, कर्नाटकहुन डॉ. बाबुराव नोडानी, हैद्राबाद येथील संजय अष्टपुत्रे, झाशीचे किशन सोनी, पुण्याचे दिलीप कदम, रत्नागिरी येथील रवींद्र मुळ्ये, दिल्ली येथील शास्वती चौधरी, पटना येथील रवींद्र दास यासारख्या देशातील ज्येष्ठ कलाकारांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांना आपली अमोघ कल्पनाशक्ती व तंत्र कौशल्याच्या सहाय्याने दृश्य स्वरूपात जनतेसमोर मांडताना देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या दृश्य कलाकृती या कार्यशाळेत सादर केल्या. ग्वाल्हेरचे ब्रजमोहन आर्य, बडोदा येथील गोविंद बिश्वास, मुंबईतील किशोर नादावडेकर , विजयराज बोधनकर, संतोष पेडणेकर, बालाजी उबाळे, महावीर पाटील, स्वाती साबळे दिल्ली येथून श्रीमती. मोयित्री, सांगली येथील वैशाली पाटील, सीमा गोंडाणे, प्रकाश सोनवणे, शार्दूल कदम यांनी वास्तववादी व समकालीन संकल्पनात्मक चित्रांतून आपले विचार सादर केले. सीबी सॅम्युअल, शिबु चंद, सागर कांबळे, अमोल सत्रे, रोहन कोळी, अमित कुमार, जसप्रीत सिंह, प्रफुल नायसे, अनिल अष्टमुडी, शराफत हुसेन, प्रदीप कुमावत, संजय टिक्कल, अमित सुर्वे, अमित धाणे, सत्यम मल्हार, गौरव कुमार दास, सुमन डे, सुमन गिल्ले, अमित वर्मा, अनिष नेटटयम, अशोक बी एस, बलदेव महरोत्रा, जयप्रकाश चौहान, कदिर खान, मधुकर कराळे, कमलेश डांगी , परबीनंदर सिंग लाल, रेंजिथलाल एम, रवींद्रन चंदनथोपे, मोनू कुमार , ओंकार बानोळे, पुरुषोत्तम आडवे, संदीप शिंदे, सर्वेश कुमार, शिफा हुसेन, श्रीकांत राजपूत, ऋषी कपिल, प्रवीण वाघमारे, अनिरुद्ध सूर्यवंशी, विक्रम परांजपे, दीपक पाटील, सिंधू दिवकरन, यांनी नवकला आणि समकालीन संकल्पना विचार यांच्या अंगाने महान क्रांतिकारकांना चित्रमय आदरांजली वाहिली.
देशातील विविध सांस्कृतिक विचार, आचार, कला संकल्पना यांचे आदान प्रदान होऊन उत्तमोत्तम कलाकृती तयार व्हाव्यात आणि त्यानिमित्ताने थोर क्रांतिकारकांचा चारित्र्यपट आणि चित्रमय संचित पुढील पिढीसाठी निर्माण व्हावे हा या कार्यशाळेचा उद्देश असल्याचे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका डॉ किरण सोनी गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. ही राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सर जेजे स्कुल ऑफ आर्टचे ज्येष्ठ प्राध्यापक तसेच कार्यशाळेचे समन्वयक शशिकांत काकडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह एमटीडीसी गणपती पुळे व wzcc चे सर्व कर्मचारी यांच्या सहयोगाने विशेष प्रयत्न करून ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडली. या कार्यशाळेच्या निमित्ताने कला प्रेमी मान्यवर प्रतिष्ठित नागरिक, कला रसिक, विद्यार्थी व पर्यटक यांना प्रत्यक्ष चित्रकला निर्मिती ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्याची संधी मिळाली. तसेच या निमित्ताने अनेक स्थानिक शालेय व कला विद्यार्थी, रसिक यांना निमंत्रित कलाकारांशी कला, संस्कृती व सर्जनशील प्रक्रिया याविषयी कलाकारांशी प्रत्यक्ष संवाद देखील साधणे शक्य झाले.
या महोत्सवातील सहभागी चित्रकारांना सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महोत्सवाच्या सांगता समारंभाला गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार ग्रामपंचायत सदस्या सारिका भिडे, ग्रामपंचायत सदस्य संजय माने, राज देवरुखकर आदींसह एमटीडीसीचे निवृत्त व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी, सहाय्यक व्यवस्थापक रुपेश करंडे व विनायक काळे कार्यशाळेचे समन्वयक शशिकांत काकडे, शूरवीर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते. या महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रकारांना रत्नागिरीतील संस्कृतीची ओळख व्हावी या निमित्ताने लोकमान्य टिळकांची जन्मभूमी व उक्षी येथील कातळशिल्पांची भेट घडवूनआणण्यात आली.यावेळी आलेल्या सर्व चित्रकारांनी येथील निसर्ग सौंदर्य व ऐतिहासिक ठेवा पाहून समाधान व्यक्त केले.