(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या चिमणपऱ्यातील संरक्षण भिंतीच्या कामाची चौकशी होण्याबाबतचे निवेदन गणपतीपुळे येथील ग्रामस्थ मेघनाथ पालकर व समीर कदम यांनी नुकतेच गटविकास अधिकारी (रत्नागिरी पंचायत समिती) यांना दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत गणपतीपुळे येथील दिनांक 23 – 5 – 2023 रोजीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी हरकत घेतलेल्या चिमणपऱ्यातील संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे वाचन केले असता, सरपंचांनी मनमानी करून ग्रामपंचायत फंडातून घाईघाईने काही सदस्यांना माहिती न देता कोणताही ठराव न घेता ज्यांच्यासाठी संरक्षण भिंतीचे बांधकाम करत होते त्यांच्याच या संरक्षण भिंतीला विरोध असल्याचे ग्रामसभेतील ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यावेळेस ग्रामस्थांनी सरपंचांना स्पष्ट शब्दात विचारणा केली की, जरा संरक्षक भिंत बांधण्यास चिमणपऱ्या लगतच्या जागा मालकाचा विरोध असताना सरपंचांनी रूपये सात लाख इतका खर्च का केला, यावर सरपंच काहीच बोलायला तयार नव्हते. तसेच सरपंचांनी संरक्षक भिंतीचे बांधकाम वहाळात केल्यामुळे वहाळाची पूर्वांपार असलेली रूंदी कमी झाल्याने पावसाळ्यात त्याचा त्रास लगतच्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना होणार आहे, तरीही सरपंच यांनी यावर उत्तर दिले नाही.
गणपतीपुळे येथील चिमणपऱ्या हा गावातून मधोमध लोकवस्तीतून जातो. त्यामुळे जर का वहाळाची रूंदी कमी केली तर चिमणपऱ्या लगत असणाऱ्या ग्रामस्थांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरून मालमत्तेचे नुकसान होणार आहे. तसेच त्याचा त्रास ग्रामस्थांना होणार, हे नक्की आहे. तसेच आजपर्यंत गणपतीपुळ्यातील वहाळ नाले व त्यांच्या बाजूने असणारे बांध हे ग्रामपंचायत/ शासन यांच्या मालकीचे आहेत. परंतु गणपतीपुळेचे सरपंच हे मानायला तयार नाहीत. सरपंच हे वहाळाचे बांधबाबत अधिकाराचा गैरवापर करीत आहेत. त्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेचे कधी न भरून येणारे नुकसान होणार आहे. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतमध्ये चुकीचा पायंडा निर्माण होणार आहे. आता यावेळेस सरपंचांना वेळीच रोखले नाही तर शेजारी प्रत्येक ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या मालमत्तेवर हक्क सांगेल.
सरपंचांना लेखी अर्ज देऊन काम थांबवण्यास भाग पाडले…
संरक्षण भिंतीचे बांधकाम मूळ बांधावर करण्यात यावा असा ठराव करण्यात आला. तरीही सरपंच आपल्या निर्णयावर कायम असल्याचे दिसून येते. तरी सरपंच ग्रामपंचायतची मालमत्ता ग्रामस्थांनी हरकत घेऊन सुद्धा ग्रामपंचायतच्या निदर्शनास सरपंचांनी केलेली चूक दाखवून सुद्धा सरपंच आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी का करत आहेत, याची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच सरपंच म्हणतात की, सांडपाण्याचा त्रास होऊ नये म्हणून संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता सांडपाण्याचा त्रास हा सन 2022 ला झाला होता. त्यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने तातडीने आगस्ट 2022 ला पावसाळ्यात सांडपाणी पाईपलाईन जोडून सांडपाण्याचा होणारा त्रास बंद करण्यात आला होता. यासोबत संपूर्ण गावाचे सांडपाणी पाईप योजनेचे काम गणपतीपुळे विकास आराखडा अंतर्गत नोव्हेंबर 2022 ला सुरू करण्यात आले असताना सांडपाण्याचा त्रास होऊ नये म्हणून घाई घाईने ग्रामपंचायत ठराव घेण्यापूर्वी इस्टिमेट मंजुरी इस्टिमेट मंजुरी घेण्यापूर्वीच सरपंचांनी माहे फेब्रुवारी 2023 मध्ये संरक्षण भिंतीचे काम काही ग्रामपंचायत सदस्यांना माहिती न देता, कोणती शासकीय पद्धत न वापरता, जास्तीत जास्त निधी खर्च करण्याच्या हेतूने काम सुरू करण्याची काहीच गरज नव्हती. काम सुरू केल्यावर सरपंचांना असे लक्षात आले की, ज्यांच्यासाठी आपण संरक्षण भिंत बांधत आहोत ते आपली एक इंच जागा द्यायला तयार नाहीत. तरीही आपल्याला कोण विचारणार आहे, अशा भ्रमात असलेल्या सरपंचांनी त्यांनी जागा देत नसल्याने संरक्षक भिंतीचे बांधकाम शासनाच्या वहाळातच बांधण्यास सुरुवात केली. संरक्षक भिंतीचे काम वहाळात करत असल्याचे ग्रामस्थांनी सरपंचांच्या निदर्शनास आणून दिले असता तीरीही भिंतीचे काम चालूच ठेवले तेव्हा ग्रामस्थांनी सरपंचांना लेखी अर्ज देऊन काम थांबवण्यास भाग पाडले.
दरम्यान कोल्हटकर तिठा ते एसटी बसस्थानक या चिमणपऱ्यातील गटाराची शासकीय चौकशी केली जिल्हा परिषद अभियंता व पाच जणांची टीम प्रत्यक्ष गटाराची व कागदपत्रांचीत पाहणी केली. मात्र अद्याप कोणताही तपशील आजपर्यत दिलेला नाही. त्यानंतर दोन वेळेस माहिती अधिकाराअंतर्गत पत्र दिलेले असून त्या संदर्भात ही कोणतीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही.
सरपंचांच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी
ग्रामस्थांनी मागितलेली गटारासंबंधीची अहवालाची प्रत व केलेल्या कार्यवाहीची माहिती मिळाली नसताना किंवा शासकीय चौकशी चालू असताना त्याच कामासाठी म्हणजेच पुन्हा गटारामध्ये (चिमण पऱ्यामध्ये) ग्रामपंचायतीमध्ये संरक्षण भिंतीसाठी का निधी खर्च करण्यात आला, ग्रामपंचायत फंडातील खर्च करताना कोणती सरकारी प्रोसिजर का वापरण्यात आली नाही, हॉटेल लॉजिंग व्यवसायिकांच्या घशात रस्त्याशेजारील ग्रामपंचायतच्या नावावर असलेले भूखंड का घालत आहेत, सरपंच ग्रामस्थ व बिडीयो यांचा आदेश का डावलत आहेत, तसेच या कामांमध्ये सरपंचांनी मनमानी कारभार करून ग्रामपंचायत फंडाचा आणि इतर कामांमध्ये दुरूपयोग केला आहे का? या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
दिनांक 22 – 11-2022 रोजी ग्रामपंचायत गणपतीपुळे येथील फाटक सभागृहात झालेल्या मीटिंगमध्ये बीडीओ साहेबांनी आदेश दिला होता की, सरपंच यांनी सांडपाणी व्यवस्थापनेसाठी ग्रामस्थ व संबंधित कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर यांची एकत्रित मिटिंग घेऊन सांडपाणी पाईप लाईन बद्दल सविस्तर चर्चा करून ग्रामस्थांच्या अडचणींचे शंकांचे निरसन करून ग्रामस्थांच्या सहकार्याने सांडपाणी व्यवस्थापनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. परंतु आजतागायत सहा महिने झाले तरी सरपंचांनी कोणतीही मिटिंग घेऊन सांडपाणी व्यवस्थापनेबद्दल ग्रामस्थांनी पाठपुरावा करून देखील माहिती दिली नाही. तसेच बीडिओ साहेबांनी सध्या सुरू असलेले सांडपाणी फिल्टर करून सोडण्यात यावे असे सांगून सुद्धा सरपंचांनी पाठपुरावा करून देखील या सहा महिन्यात कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत सरपंच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत असे दिसून येते.
हॉटेल लॉजिंग व्यवसायिकांना सरपंच का पाठीशी घालत आहेत. सरपंचांना संबंधित व्यावसायिकांकडून काही मिळत आहे का, अशी चर्चा गावात चालू आहे. त्याची चौकशी करण्यात यावी. आरोग्यासारख्या गंभीर समस्येकडे सरपंच का दुर्लक्ष करत आहेत. त्याचबरोबर सरपंच वरिष्ठ अधिकारी साहेबांच्या आदेश धाब्यावर बसून ग्रामपंचायत सदस्यांना विचारात न घेता मनमानी कारभार करत आहेत. ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची सरपंच उत्तरे देत नाही त्यामुळे प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो व नंतर असे लक्षात येते की सरपंच यांनी त्यांच्या मनाप्रमाणे ग्रामस्थांचे काहीही न ऐकता ग्रामस्थांचा विरोध डावलून काम केले आहे. याची देखील चौकशी करण्यात यावी.
चौकशी करून वेळीच आळा घालावा…
आपटा तिठा ते एसटी स्टँड रस्त्याच्या बाजूने पावसाळी पाण्यासाठी असलेली गटारे भरलेली आहेत. दोन वर्षात दोन वेळा सार्वजनिक बांधकाम अधिकारी गणपतीपुळे येथे पाहणीसाठी व गटारे मोकळी करून देण्यासाठी येऊन सुद्धा सरपंचांनी त्यांना योग्य माहिती न दिल्याने गटारे मोकळी होऊ शकली नाहीत. सरपंच स्वतःही काही करत नाही व इतर अधिकारी वर्ग काम करून देत असतात त्यांनाही करायला देत नाहीत, अशी परिस्थिती यामुळे झालेली आहे. तरी बीडिओ यांनी ग्रामस्थांचे ग्रामपंचायत फंडाचे व ग्रामपंचाय मालमत्तेचे होणारे नुकसानीबाबत योग्य ती चौकशी करून वेळीच आळा घालावा, या मागणीचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच माहितीसाठी निवेदनाची प्रत ग्रामस्थ समीर यशवंत कदम व मेघनाथ विनायक पालकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे.